कुख्यात गुन्हेगार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेम याला पॅरोल देण्याला सरकारपक्षानं विरोध केला आहे. गेल्या नोव्हेंबरमधे सलेमने आपल्या भावाच्या निधनानंतर पॅरोलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाडे केली होती. मात्र पॅरोल मिळाल्यावर तो पुन्हा फरार होऊ शकतो, आणि पोर्तुगालमधून त्याचं हस्तांतरण झालं असल्याने भारत सरकार पोर्तुगालला उत्तरदायी आहे. सलेम फरार झाल्यास उभय देशातल्या संबंधांना आणि समाजाला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून त्याला रजा देऊ नये असा युक्तिवाद राज्य सरकार आणि सीबीआयने केला आहे. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी पुढची सुनावणी येत्या २८ जानेवारीला ठेवली आहे.
Site Admin | January 20, 2026 8:07 PM
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेमला पॅरोल देण्याला विरोध