डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथल्या व्यवस्था ठरवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्वीनी जोशी आदी उपस्थित होते. चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसंच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर आणि आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचं योग्य नियोजन आणि नियंत्रण करावं. अनुयायांसाठी जागोजागी सूचना फलक लावावेत, असं राजेश कुमार यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | November 12, 2025 6:38 PM
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर सूक्ष्म अंमलबजावणीचे मुख्य सचिवांचे निर्देश