भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.
चैत्यभूमी, शिवाजी पार्क, ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृहं, सुरक्षा, आरोग्य आदी बाबींची चोख व्यवस्था केली आहे. या सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे ८ हजारांहून जास्त अधिकारी-कर्मचारी तैनात असून, चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर, तसंच महानगरपालिकेच्या विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.