डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई, कलबुर्गी ते मुंबई, अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वे कल्याण ते परळ मार्गावरही १२ अतिरीक्त रेल्वेगाड्या चालवणार असल्याचं मध्य रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | December 4, 2025 3:32 PM | Central Railway | Mahaparinirvan Din
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या धावणार