महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राला गौरवण्यात आलं आहे. ऐरोलीच्या या केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र आणि ओपन ऍक्सेस या दोन राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातल्या  विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचं  मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले जातात.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.