MahaKumbh : माघ पौर्णिमा स्नानासाठी भाविकांची गर्दी

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आज माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे. या वर्षी 10 लाखांहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू झाला. आतापर्यंत 46 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं आहे.