महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम यांच्यात सामंजस्य करार

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम या शासकीय कंपनीसह सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणं, अणुऊर्जा नियामक मंडळाच्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचं व्यावसायिकीकरण करणं, मेक इन महाराष्ट्र उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणं हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे.