राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती. आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते, तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते. गोंदिया जिल्हानिर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
शिवणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून आदरांजली वाहिली आहे.