मध्य प्रदेशात सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर महाबोधी महोत्सव सुरू

मध्य प्रदेशातल्या सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर आजपासून दोन दिवसीय महाबोधी महोत्सव सुरू होत आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज संध्याकाळी जंबुद्वीप पार्क इथं आयोजित या महोत्सवाचं उदघाटन करतील. भगवान बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मौदगल्यायन यांच्या अस्थींचं पूजन रिजिजू करतील.