प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ६३ पूर्णांक १७ शतांश किमी लांबीच्या रायबरेली-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण, चार ठिकाणी चौपदरी बायपास, प्रयागराज इनर रिंग रोड फाफामाऊ इथं गंगा नदीवरच्या सध्याच्या पुलाला समांतर सहा पदरी पूल बांधणं, यासह अनेक प्रकल्पांचा आढावा यावेळी घेतला गेला.
गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांचं काटेकोरपणे पालन करून सर्व बांधकामं वेळेत पूर्ण करायचे तसंच, २५ डिसेंबरपर्यंत कामं पूर्ण करायचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. प्रमुख महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे आणि सुरक्षा यंत्रणा बसवायचे निर्देश मंत्र्यानी अधिकाऱ्यांना दिले असून रुग्णवाहिका, गस्ती पथकं आणि वैद्यकीय-आणि-वाहतूक-सहाय्यासारख्या अतिरिक्त सुविधा पुरवण्यावरही भर दिला जाणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.