डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

३० कोटींच्या जीएसटी अफरातफरप्रकरणी मॅजिक गोल्ड कंपनीचा संचालक अटकेत

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे.

 

वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणं किंवा वापरणं अशा कारवायांमध्ये टेलर याचा सहभाग असल्याचं आढळलं आहे. टेलर याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.