प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. गेले काही दिवस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. देशातल्या अग्रणी दुचाकी वाहन उद्योग बजाज ऑटोचे ते मानद संचालक होते.
त्याखेरीज महाराष्ट्र स्कूटर लिमिटेड चे अध्यक्ष होते. बजाज उद्योगसमूहातल्या इतर कंपन्यांमधेही ते संचालकपदावर होते. प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ते नातू होते तर रामकृष्ण बजाज यांचे पुत्र होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.