मध्यप्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज राज्यातील नवव्या व्याघ्र प्रकल्पाचे अर्थात माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन करतील. या उद्यानाच्या आतल्या भागात १३ किलोमीटर लांबीच्या दगडी सुरक्षा भिंतीचंही ते उद्घाटन करतील. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे देशातील पट्टेदार वाघांसाठीचं अठ्ठावनावं संरक्षित उद्यान असेल. शिवपुरी जिल्ह्यात असलेलं हा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव संवर्धन आणि पर्यटनाला प्रोत्साहन देईल. अशी आशा यादव यांनी व्यक्त केली.