मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू केली आहेत. वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन, मादागास्कर मधल्या तरुणाईनं सरकार विरोधी आंदोलन छेडलं असून, काल त्याचा उद्रेक झाला, आणि हजारो निदर्शकांनी राजधानीमधल्या ‘मे थर्टीन स्क्वेअर’ भागात प्रवेश केला. या आंदोलनात मालागासी लष्कर मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहे.
Site Admin | October 12, 2025 2:24 PM | Madagascar
मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू