September 25, 2024 3:29 PM

printer

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत अग्रमानांकित किदंबी श्रीकांतने इस्राएलच्या दुबेवेंको दानिल चा २१-१५, २१-१४ असा पराभव करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

 

महिला दुहेरीतही भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांची जोडी उपउपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. पहिल्या फेरीत जपानच्या अकारी सातो आणि माया तागुची या जोडीचा त्यांनी 15-21, 21-16, 21-14 असा पराभव केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.