मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताने विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह दमदार सुरुवात केली. पुरुष दुहेरीत सत्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने मलेशियाच्या लो हंग यी आणि एनग चियॉंगवर सरळ सेटमध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.महिला एकेरीमध्ये, अनमोल खरब आणि तस्नीम मीर यांनी त्यांच्या पात्रता फेरीमध्ये विजय मिळवून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. अनमोलने अझरबैजानच्या तर तस्नीमने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीत, डिंकु सिंग कोंथुजाम आणि मान मोहम्मद यांनी हाँगकाँगच्या जोडीवर विजय मिळवून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले. मिश्र दुहेरीमध्येही यश मिळवत भारताच्या थंडरंगिनी हेमा नागेन्द्र बाबू आणि प्रिया कोनजेंगबाम यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
Site Admin | July 30, 2025 3:23 PM
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात
