समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमध्ये समरकंद इथं झालेल्या ४३ व्या सर्वसाधारण बैठकीत युनेस्कोनं लखनौ शहराला ‘गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत मान्यता दिली.
यामुळे लखनौला जगभरातल्या ७० गॅस्ट्रोनॉमी शहरांमध्ये स्थान मिळालं असून, हैदराबादनंतर हा किताब मिळवणारं भारतातलं हे दुसरं शहर ठरलं आहे.