हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु-नितीन गडकरी

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु झाल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवर बासष्ठ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक पट्ट्यावर रोपं लावण्याचं काम सुरु झालं आहे. या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.  यामुळे स्त्रिया, स्वयंसेवी संस्था अशा परिघावरच्या  ग्रामीण समुदायाला लाभ होईल आणि सामाजिक आर्थिक उन्नतीच्या दिशेने त्यांची वाटचाल होईन असंही त्यांनी सांगितलं.