व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली. त्यानुसार नवी दिल्लीत १९ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत १ हजार ६३१ रुपये ५० पैसे असेल. मुंबईत या सिलेंडरची किंमत १ हजार ५८३ रुपये असेल. उपाहार गृह आणि तयार खाद्यपदार्थांच्या दुकानांना याचा फायदा होईल.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.