नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची भेट म्हणून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर जोडणी देणार आहे. या आर्थिक वर्षात लाभार्थींना मिळणारी ही भेट महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नाला अधिक मजबूत करेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे 10 कोटी 60 लाख पर्यंत लाभार्थ्यांची संख्या होणार आहे. असं पेट्रोलिअम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी सांगितलं. 2016 मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेत यापुर्वी 10 कोटी 30 लाख गॅस सिलेंडर जोडणी देण्यात आली आहे.
Site Admin | September 23, 2025 9:02 AM | LPG Gas Cylinder
खुशखबर! 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर देण्याचा सरकारचा निर्णय
