डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

६८वी राष्ट्रकुल संसद परिषद : लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार

६८व्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीमंडळ लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, २४ राज्यं आणि  केंद्रशासित प्रदेशातले मिळून ३६ तालिका अध्यक्ष आणि १६ सचिव यांचा या पथकात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉ अजित गोपछडे देखील परिषदेत भाग घेतील. बार्बाडोसमधे ब्रिजटाऊन इथं  आजपासून येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालेल.