देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण – सभापती ओम बिर्ला

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत चौथ्या लेखा परीक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सार्वजनिक संपत्तीचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठीच केला जाईल याची हमी कॅगमुळे मिळते, असंही ते म्हणाले. देशातलं सुशासन आणि पारदर्शकता यात कॅग नं दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी लेखा परिक्षण दिन साजरा केला जातो. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.