लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. ११ वाजता कामकाज सुरु झाल्यावर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज आणि इतर महत्त्वाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन सभापतींनी केलं मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.