वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला. सभापती ओम बिरला यांनी सांगितलं की, महाभियोग चालवण्याचे १४६ सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत.
न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरुप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली. त्यात सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी. व्ही. आचार्य यांचा समावेश आहे.
न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात पदावर असताना त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड आढळल्यानंतर त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्याची चर्चा सुरु झाली आहे.