लोकसभेत आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील. चर्चेसाठी दहा तासांचा वेळ देण्यात आला आहे.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज वंदे मातरम गीतावर चर्चा आणि उद्या निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.