पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे २०२१ ते २०२३ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
राही भिडे, सुधीर पाठक, भाऊ तोरसेकर, विजय बाविस्कर आणि बाळासाहेब जाधव या पाच पत्रकारांना हे यंदाचे मानकरी आहेत. एक लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सन २०२१ सालचा अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार मंगेश वैशंपायन यांना मिळाला आहे. १ लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
याखेरीज इतर विविध प्रकारांमधे दिले जाणारे पुरस्कारही जाहीर झाले असून ५१ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.