डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरल्या हल्ल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाने शून्य प्रहरात उपस्थित केला. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नकली निवडणूक ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
विरोधी पक्षांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचना लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्या. तसंच सभागृहात फलक झळकावणं नियमाच्या विरोधात असल्याचं विरोधकांना सांगितलं. बिर्ला यांनी खासदारांना सभागृहात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. तरीही गोंधळ वाढतच गेल्यानं सभापतीनी सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं. कडधान्यांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याची माहीती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत दिली. कडधान्यांच्या उत्पादन वाढीकरता सरकारने विविध उपाययोजना केल्याचं त्यांमी सांगितलं. २०२३-२४ मधे देशात कडधान्याचं उत्पादन २४२ लाख मेट्रिक टन इतकं झालं होतं तर एकूण मागणी २८० मेट्रिक टन होती. ३० ते ४० लाख टन कडधान्यांची आयात करण्यात आली असं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा