लोकसभेचं काजकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं  कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

 

लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या काल दिल्ली इथं झालेल्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचं वक्तव्य  हे दुर्दैवी आणि लाजीरवाणं आहे असं रिजिजू म्हणाले. यानंतर सत्ताधारी  पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली, गोंधळ वाढत गेल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. त्याआधी सभागृहाचे दिवंगत सदस्य सुभाष आहुजा, सलाहुद्दिन आणि बालकृष्ण चौहा यांना  आदरांजली  वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

 

राज्यसभेतही सभागृह नेते जे पी नड्डा यांनी काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. गदारोळ वाढत गेल्यानं उपाध्यक्ष हरिवंश यानी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. 

 

दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्य़ावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीचा निषेध केला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे  यांनी दोन्ही सभागृहांमधे माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. भाजपा आणि रालोआ कधीही कुणाचाही अपमान करत नाहीत असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.