पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक 12 टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रिय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिली आहे. यामुळे कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत 31 टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत पशुधन रुपांतरण याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते.
भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वातील सहकारी पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.