भारतीय राजदूत पुनित रॉय कुंडल यांनी भारतीय प्रदर्शनासाठी अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांचे स्वागत केले

पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं सुरूअसलेल्या डिप्लोमॅटिक बझार २०२५मधल्या भारताच्या प्रदर्शनाला पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांनी काल भेट दिली. भारताचे पोर्तुगालमधले राजदूत पुनीत रॉय कुंडल यांनी त्यांचं स्वागत केलं. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारत-पोर्तुगाल यांच्यातल्या राजनैतिक संबंधांची ५० वर्षं यावर या प्रदर्शनात भर दिल्याची माहिती भारताच्या पोर्तुगालमधल्या दूतावासानं दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.