राज्यातल्या १३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट महादेव या योजनेचा प्रारंभ आज लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. लिओनेल मेस्सी हा गोट इंडिया दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबई दौऱ्यावर होता. मुंबईत वानखेडे मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने त्याची १० क्रमांकांची जर्सी मेस्सी याला भेट दिली तर मेस्सी याने सचिनला फुटबॉल भेट म्हणून दिला. वानखेडे मैदानावर आपण अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालो आहोत, आणि मेस्सीची इथली उपस्थिती हाही एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मनोगत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलं.
Site Admin | December 14, 2025 8:05 PM | goat | messi
लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ