विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर खासगी दौऱ्याच्या निमित्तानं भारतभेटीवर आला आहे. कोलकाता विमानतळावर आज पहाटे चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोलकात्यात लेक टाऊन इथं त्याच्या सन्मानार्थ ७० फुटी पुतळा उभारला आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सी हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीला भेट देणार आहे.
सकाळी कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर हजारो चाहत्यांना मेस्सीनं हात उंचावून अभिवादन केलं. पण त्या अल्पकाळच्या अभिवादनाने समाधान न झालेले चाहते नाराज झाले. आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावल्या. यामुळे तिथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.