बुलढाणातल्या ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

विक्रीची नोंद न केल्याने तसंच मासिक प्रगती अहवाल सादर न केल्यामुळे बुलढाणा जिल्यातल्या ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसंच २०७ कृषी केंद्रांना खत आणि बियाणे विकायला मनाई करण्यात आली आहे. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नाही यासाठी प्रशासनाकडून बुलढाण्यातल्या दीड हजाराहून अधिक कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.