December 24, 2025 1:00 PM | Air Crash | Libya

printer

लिबियाचे लष्करप्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू

लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल हद्दाद आणि चार जणांचा तुर्किएची राजधानी अंकारा इथं काल विमान अपघातात मृत्यू झाला. ते तुर्किएवरून लिबियाला परतत असताना हा अपघात झाला. ही दुखद घटना असल्याचं लिबियाचे प्रधानमंत्री अब्दुल हमिद दबेबाह यांनी म्हटलं आहे.  लष्करी अधिकारी अल फितौरी गरिबील, मोहम्मद अल कतारी, हद्दाद यांचे सल्लागार मोहम्मद अल अस्वी दियाब आणि लष्करी छायाचित्रकार मुहम्मद ओमर अहमद महजौब यांचा मृतांमधे समावेश आहे. याशिवाय विमानातल्या तीन कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाल्याचं तुर्किएनं म्हटलं आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.