लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग दिल्लीत दाखल

नवी दिल्लीत होणाऱ्या १९ व्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषद सहभागी होण्यासाठी लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग आज दिल्लीत दाखल झाले. कोंग यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

 

CII भारत आफ्रिका व्यापारी परिषदेला आजपासून सुरुवात होत असून २२ ऑगस्टपर्यंत ती चालणार आहे. आफ्रिकेच्या विकासात आणि प्रादेशिक आणि जागतिक पुरवठा साखळींच्या एकात्मतेत भारत-आफ्रिका भागीदारीची भूमिका वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणं हा या परिषदेचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विविध मंचांवर भारताच्या उमेदवारीला लायबेरियानं पाठिंबा दिला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.