कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल आले असून मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पार्टी १६७ जागांवर आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर पीअर पॉइलीवर यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी १४५ जागांवर आघाडीवर आहेकॅनडाच्या ३४३ सदस्यांच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी १७२ जागा जिंकणं आवश्यक आहे.
त्यामुळे लिबरल पार्टी विजयाच्या जवळ पोहोचली आहे. सक्षम आणि स्वतंत्र कॅनडाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी तयार राहावं असं आव्हान कार्नी यांनी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते कधीही शक्य नाही असंही ते म्हणाले.