विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणाचा आज समारोप

महाराष्ट्र विधीमंडळात प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांसाठी नवी दिल्लीत संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे; या कार्यक्रमाचं उद्घाटन काल लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते झालं. राज्य विधीमंडळाच्या सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन बिर्ला यांनी यावेळी केलं. या प्रशिक्षणाचा समारोप आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.