डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्याने या गदारोळातच पुरवणी मागण्या मंत्री उदय सामंत यांनी सभागृहासमोर मांडल्या. त्यावर एकमत झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.