August 14, 2025 1:39 PM

printer

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं निधन

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं आज कोलकाता इथं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस यांचे ते वडील होते. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किन्ससने आजारी होते आणि त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघात वीसे पेस यांचा समावेश होता. क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बीचं मैदानही त्यांनी गाजवलं. १९९६ ते २००२ या काळात भारतीय रग्बी फुटबॉल संघटनेचे ते अध्यक्षही होते.