डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दलचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिथुन चक्रवर्ती यांचं पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाला असून यामुळे मिथुन यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची दखल घेतली गेल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मिथुन हे सांस्कृतिक आदर्श आहेत असे गौरवोद्गारही प्रधानमंत्र्यांनी काढले. 

 

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून हा पुरस्कार आपले कुटुंबीय आणि चाहत्यांना अर्पण केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.