डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले…
‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर, आणि या राज्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्‌धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.’’
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आपल्या कार्यकाळातले सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं, आपण या विषयावर बोलणं, योग्य नसल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.