डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लावणी गौरव पुरस्कार जाहीर

लावणी कलावंत महासंघानं यंदाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर केले असून शाहीरी परंपरेतले  जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित केला आहे.  लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर यांना  लावणी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.  महासंघाच्या ११ व्या  वर्धापनदिनानिमित्त येत्या २४ जूनला मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

 

या सोहळ्यादरम्यान लावणी कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा तसंच  नवरात्र सोहळ्यादरम्यान झालेल्या  नवरंग स्पर्धेमधल्या  विजेत्या स्पर्धकांचा  सन्मानही  केला जाणार आहे.