डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धुळ्यात ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ

धुळे वनविभागच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानातर्ंगत वनविभाग तसेच रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम आज राबवण्यात आला.

 

 
या वृक्षलागवडीसाठी मजुरांना ५०० रुपये प्रतिदिन रोजगार मिळणार आहे. यात ३०० रुपये नरेगा आणि २०० रुपये राज्य शासनाकडून देण्यात येईल. या योजनेत सांजोरी गावातील गावकर्‍यांना रोजगाराची एक चांगली संधी असून सांजोरी गावातील रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड धारकांनी या वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला तर त्यांना मोठया प्रमाणात रोजगार ही उपलब्ध होणार असून गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.