परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी मानचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचं अनावरण केलं. या शिखर परिषदेदरम्यान भारत व्यापक जागतिक कल्याणासाठी ब्रिक्स देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रिक्स यंदा २० वर्ष पूर्ण करत असून या काळात उदयोन्मुख बाजारपेठा, विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून सातत्याने विकसित होत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.जयशंकर यांनी माध्यमांना दिली.
Site Admin | January 13, 2026 3:01 PM
ब्रिक्स शिखर परिषदे २०२६ चं मानचिन्ह, संकेतस्थळाचं अनावरण