डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 10, 2025 3:42 PM | Latur | soybean

printer

लातूर : शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्यासाठी आंदोलन

सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ववत सुरु करून शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभावानं  खरेदी करावं, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आंदोलन सुरु आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, छावा संघटना,  युवा सेना इत्यादी पक्षांचे काही  कार्यकर्ते बीएसएनएलच्या जवळपास दीडशे फूट उंच टॉवर वर चढले आहेत . शेतकऱ्यांकडे  हजारो टन सोयाबीन अद्यापही खरेदीविना पडून आहे. सरकारनं  किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचचं  सोयाबीन हमी भावानं  खरेदी करावं  अन्यथा प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.