जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी या हेतूसाठी लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला आजपासून सुरूवात झाली. पाण्याची उपलब्धता आणि योग्य वापर याबाबत जनजागृती आवश्यक आहे. तसंच जलसंवर्धनाचं महत्व नागरिकांना समजून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर यांनी सांगितलं. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत हा कृती पंधरवडा राबवण्यात येणार आहे.
Site Admin | April 15, 2025 6:37 PM | Latur
लातूरमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरूवात
