डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या डोगरी भाषेतल्या लघुकथांच्या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा काल संस्कृती मंत्रालयानं केली. या पुस्तकाची निवड तीन सदस्यांच्या समितीने एकमताने केली आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. ताम्रपट आणि १ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८ मार्च रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात अरोरा यांच्या कुटुंबातील सदस्याला पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.