लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रं तयार करुन सर्वत्र कसून शोध घेण्यात येत आहे.
पर्यटकांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमधे आज बंद पाळण्यात येत आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे या हल्ल्याच्या निषेधात शांततापूर्ण निदर्शन करण्यात येत आहेत.पहलगाम, दक्षिण काश्मीरमधे अनंतनाग, कुलगाम आणि इतर जिल्ह्यांमधे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.