May 29, 2025 8:57 PM

printer

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 4 जवान ठार

पाकिस्तानात उत्तर वझिरास्तानच्या शावल भागात एका सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान ठार झाले.

 

काल रात्री दहशतवाद्यांनी या चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं अद्याप घेतलेली नाही. मात्र, पाकिस्तानी तालिबान आणि इतर दहशतवादी गट या भागात वारंवार हल्ले करत असतात.