डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘लापता लेडीज’ चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर

आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा चित्रपट ९७व्या अकादमी पुरस्कारासाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृत रीत्या पाठवण्यात आला होता. मात्र अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही.

हिंदी भाषेत चित्रीत केलेल्या ब्रिटीश-भारतीय ‘संतोष’ या चित्रपटानं १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पण, हा चित्रपट ब्रिटनकडून सादर होत आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ ला होणार आहे.